चारोळ्या - " नेते भरवती जनाशीर्वाद यात्रा, पुढील निवडणुकीसाठी एकमेव मात्रा !"

Started by Atul Kaviraje, August 28, 2021, 03:09:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     विषय : नेत्यांची जन-आशीर्वाद यात्रा
                         वास्तव राजकारणी चारोळ्या
    " नेते भरवती जनाशीर्वाद यात्रा, पुढील निवडणुकीसाठी एकमेव मात्रा !"
                                 (भाग-१)
   --------------------------------------------------------------


(१)
"यात्रेला" आलंय जत्रेचे स्वरूप
जनता झालीय सारी एकरूप
"जन-आशीर्वाद" घेण्या उतरलेत रस्त्यावर,
नेत्यांना आलाय चांगलाच हुरूप.

(२)
रस्ता माणसांनी फुलून गेलाय
हिंदोळ्यागत मागे-पुढे झुलून राहिलाय
झालेल्या कार्याची करीत उजळणी,
नेता जनतेपुढे नमता झालाय.

(३)
नेता म्हणतोय --
     "जनता' हीच माझी तारणहार
     तीच घालते गळ्यामध्ये पुष्प-हार
     निवडून देणारी तीच अटकेपार,
     तीच आमचा उद्याचा आधार.

(४)
"जनता-जनार्दनात" त्यांना दिसतोय "जनार्दन"
जनताच त्यांची देवी अन देवा
"आशीर्वाद" घेण्या सज्ज होऊन,
नेते करताहेत मनोभावे सेवा.

(५)
जनतेला अजूनही नाही कळतं
कळले तरीही नाही वळत
पुढील निवडणुकीचीच सारी तयारी,
"यात्रा" असते फक्त नामधारी.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2021-शनिवार.