II श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा II-लेख आणि शुभेच्छा संदेश

Started by Atul Kaviraje, August 28, 2021, 02:07:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                       II श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा II
                                लेख आणि शुभेच्छा संदेश
                      -------------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

   श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर  श्रावण लेख आणि  काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.

     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.

     'श्रावणात घननिळा बरसला' या ओळी आपोआपच श्रावण सुरू झाल्यावर ओठांवर गुणगुणाव्याशा वाटतात. मराठी महिना श्रावण हा आपल्याकडे अधिक प्रसिद्ध आहे तो सणांसाठी. सण समारंभ आणि व्रतवैकल्याने भरलेला असा हा मराठी महिना. इतकंच नाही तर या महिन्यात निसर्गामध्ये इतका उत्साह भरलेला असतो. चहूबाजूला हिरवळ आणि आनंदीआनंद असा हा महिना नेहमीच सर्वांना हवाहवासा वाटणार आहे. त्यामुळेच या महिन्यावर आणि पावसावर अनेक गाणी आणि कविताही लिहील्या गेल्या आहेत. मंगलमय असा हा श्रावण महिना ज्यामध्ये मंगळगौर, सोळा सोमवार  , शनिवारचे उपवास, अनेकविध पूजा केल्या जातात. यावर्षी श्रावण मास 2021 मध्ये 9 ऑगस्ट रोजी सुरू होत असून याची समाप्ती 6 सप्टेंबर, 2021 रोजी होत आहे. हा महिना आपल्या सगळ्यांसाठीच शुभदायी जावो अशा शुभेच्छा देण्यासाठी खास हा लेख.

    श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या ओळी श्रावण म्हटला की, सर्वांनाच आठवतात. सणांनी भरभरून युक्त असा हा महिना मनात खूपच उल्हास निर्माण करतो. अशाच या मंगलदायी महिन्याच्या अर्थात श्रावण महिना शुभेच्छा  खास तुमच्यासाठी. 


                 🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी 🌳:-----
                ---------------------------------

1.  निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून,
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

2. येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून,
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून.
     श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा I

3. रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण,
फुलाफुलांत उमलला श्रावण.
      श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!

4. सणासुदीची घेऊन उधळण,
आला रे आला हसरा श्रावण!

5. परंपरेचे करूया जतन,
आला आहे श्रावण.
     श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

6. आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी,
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी.
     श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

7. हासत गात, घेऊन सरींची बरसात,
आला तो मनमोहक माझा श्रावण महिना.

8. जरासा हासरा, जरासा लाजरा,
सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

9. कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण,
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण.

10. संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या,
आला तो श्रावण पुन्हा आला.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.08.2021-शनिवार.