आठवण

Started by kavitabodas, March 24, 2010, 05:27:50 PM

Previous topic - Next topic

kavitabodas

वाटते अजूनही आहेस जवळी तू माझ्या
स्पर्शसुखाचा गोडवा  कसा विसरू सांग ना
मोर पिसा सम भासे हा धुंद वारा
जोडीला मातीचा सुगंध सोसवेना
आठवांनी तुझ्या दाटून का येतो गळा सांग ना
बाहुत तुझ्या  क्षणभर तरी मिळेल ना विसावा
काळी उमललेली कोमेजेल का सांग ना
धुंद त्या संध्यासमयी बिलगून तुला
स्वप्ने पहिली मी वेड्यासारखी
घरी आल्यावर  तुझ्या कळाले
हे सत्य नाही पुरे होण्यासाठी
उठले काहूर बैचेन जीव झाला
दैवाने अशी थट्टा का केली उमगेना
तू जवळ  असूनही माझा नव्हतास का सांग ना

कविता बोडस

vickygawali


राहुल

कविता, कविता खूप सुंदर आहे