II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II-शुभेच्छापर संदेश

Started by Atul Kaviraje, August 29, 2021, 12:52:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                     ----------------------------------
                     
                   
मित्र/मैत्रिणींनो,

   श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर , काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.

     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.


                🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी 🌳:-----
               --------------------------------

      श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही कविता, संदेश याचा उपयोग करू शकता. अशाच काही खास शुभेच्छा.

1. कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर,
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर.
     श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय,
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या.

3. श्रावण महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा!

4. सुरू होणारा हा श्रावण तुमच्या मनाला सुख,
     शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!

5. मराठी परंपरेचा वारसा,
         श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.08.2021-रविवार.