II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II - इतर सदिच्छा

Started by Atul Kaviraje, August 29, 2021, 12:56:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                     ----------------------------------
                                   इतर सदिच्छा
                                 --------------
                   
मित्र/मैत्रिणींनो,

   श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर , काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.

     शिवभक्त दरवर्षी श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी 9 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतो.या महिन्यात जिथे एकीकडे रिमझिम पावसाचा वर्षाव होतो, दुसरीकडे भगवान शंकराची कृपा-आस्था आहे.श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते. यावर्षी पवित्र श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, जो ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.


                🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी 🌳:-----
                --------------------------------

                  🍀श्रावण सुविचार व लघु कविता मराठी 🍀:-----
                ------------------------------------------
                 

     आता सोशल मीडियाच्या जगात अनेक वेळा कोट्स आणि संदेशांची आपल्याला गरज भासते. श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास कोट्स.

1. पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा,
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा. 

2. आकाशी मेघ गरजती, गुंफूनी माळा,
मन चिंब भिजवूनी जाई हा मनी वसणारा पावसाळा.
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

3. बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल,
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल.

4. श्रावणात पावसाने कमालच केली, धो धो कोसळून धमालच केली,
अशाच मनसोक्त धारांसाठी श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. घेतलीच नाही क्षणभरही उसंत,
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत.

     श्रावण महिन्यात तुम्हाला शुभेच्छा संदेश द्यायचे असतील तर मराठीतून तुमच्यासाठी खास संदेश. तुम्हीही तुमच्या प्रियजनांना आपल्या मातृभाषेतून शुभेच्छा द्या.

1. चाहूल तुझी लागताच येते मन बहरून,
अशा या श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!

2. सरीवर सरी येतात आणि मन जातात भिजवून,
श्रावण आला सांगतच येतात अगदी धावून. 

3. श्रावण महिन्याच्या हिरव्यागार शुभेच्छा!
तुमचं आयुष्यही सदैव असं टवटवीत राहो हीच सदिच्छा!

4. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी,
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी.

5. हासरा नाचरा,जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबूस कोमल पाऊल टाकीत,
भिजल्या मातीत श्रावण आला.

                    (कवी–विजय बावीस्कर)
                  -----------------------

6. श्रावण मासाच्या हिरव्यागार शुभेच्छा!


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.08.2021-रविवार.