गीत - "उषःकाल होता होता काळरात्र झाली"

Started by Atul Kaviraje, August 29, 2021, 03:57:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया एक आगळे वेगळे गीत. "सिंहासन" या चित्रपटासाठी हे गीत गायले आहे, श्रीमती आशा भोसले आणि श्री रवींद्र साठे यांनी, आणि या गीताचे गीतकार आहेत श्री सुरेश भट. या गीताचे बोल आहेत - "उषःकाल होता होता, काळरात्र झाली"


                           "उषःकाल होता होता, काळरात्र झाली"
                           ---------------------------------

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। धृ ।।

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। १ ।।

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। २ ।।

उभा देश झाला आता एक बंदिशाळा
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। ३ ।।

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ।। ४ ।।


                    ====================
                         गीतकार : सुरेश भट
                         गायक : आशा भोसले , रवींद्र साठे
                         संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
                         चित्रपट : सिंहासन (१९७९)
                   =====================


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीप्लॅनेट.को)
                   -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.08.2021-रविवार.