देव मल्हारी

Started by शिवाजी सांगळे, August 30, 2021, 10:33:40 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

देव मल्हारी

मल्हारी मल्हारी मल्हारी देव मल्हारी
चला जाऊ या, जाऊ या गड जेजुरी || धृ ||

गड सोन्याचा नवलाख पायऱ्यांचा
भव्यदिव्य उंचच उंच दिपमाळांचा
दगडी कमानी नक्षीदार ओवऱ्याचा
गड हा भंडारा खोबरं उधळण्याचा

यळकोट करू घोष चढताना पायरी
सगळेच उधळू वाटेने भंडारा सोनेरी
मल्हारी मल्हारी मल्हारी देव मल्हारी
चला जाऊ या, जाऊ या गड जेजुरी || १ ||

निर्दालक देव मणी मल्ल दैत्यांचा
ईथं मुक्काम भैरव न् म्हाळसाईचा
देव खंडोबा सगळ्या या राज्याचा
महिमा मोठा नवसाला पावण्याचा

करावी नियमित सोमवतीची वारी
तारणहार भक्तांचा, भोळा कैवारी
मल्हारी मल्हारी मल्हारी देव मल्हारी
चला जाऊ या, जाऊ या गड जेजुरी || २ ||

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९