II जय श्री कृष्ण II-II गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा II-(लेख क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, August 30, 2021, 02:06:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II जय श्री कृष्ण II
                        II  गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा II
                    --------------------------------------
                                 (लेख क्रमांक-१)
                               ----------------
                                   
मित्र/मैत्रिणींनो,

     आज , 30-ऑगस्ट,२०२१ चा सोमवारचा पावन दिवस, म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमी (श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, गोकुळाष्टमी) चा पवित्र दिन. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी भावांस, आणि कवयित्री बहिणींस, या गोकुळाष्टमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.  जाणून घेऊया भगवान कृष्णाची महती,महत्त्वपूर्ण माहिती, व इतर लेख:---


                                     गोकुळाष्टमी
                                        लेख
                                  --------------


     गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे महत्व जरूर जाणून घ्या:-----


     भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतीयांसाठी जन्माष्टमी हा तर एक मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान कृष्णाचा जन्मदिवस. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे हा सणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे देशभरात जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत हा सण उत्त्साहात साजरा केला जातो.

                        भगवान कृष्ण जन्माची कहाणी:-----
                      ------------------------------

     श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते. कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितली जाते की, कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पूत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात अपत्ये ठार केली होती. म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे त्याला सुपूर्त केलं होतं. भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्णजन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते.

                                कृष्ण जन्माष्टमी कधी आहे:-----
                             --------------------------

     यावर्षी 30 ऑगस्ट 2021 ला भारतात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. तर 31 ऑगस्ट 2021 ला गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

                             भगवान कृष्णाचे महाभारतातील कार्य:-----
                           ------------------------------------

     महाभारत हा ग्रंथ भारतातील एक प्राचीन आणि धार्मिक ग्रंथ आहे. महर्षी व्यासांनी या ग्रंथाची निर्मिती केली. महाभारत ही पांडव आणि कौरवांच्या महायुद्धाची कथा आहे. महाभारतामध्ये कृष्णाचे कार्य महत्त्वाचे आहे. कारण कृष्णाने अर्जुनाला योग्य वेळी अचूक उपदेश केल्यामुळेच पांडव महाभारतातील धर्मयुद्ध जिंकू शकले.

                (साभार आणि सौजन्य-तृप्ती पराडकर)
             ------------------------------------

               (संदर्भ-मराठी .पॉप एक्स ओ.कॉम)
            ----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2021-सोमवार.