गौळणी-राधा-कृष्ण प्रेम-खोड्या व इतर चारोळ्या - चारोळी क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 30, 2021, 11:14:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आजच्या दिनांक-३०.०८.२०२१, गोकुळाष्टमीच्या सुमुहूर्तावर, "गौळणी-राधा-कृष्ण प्रेम-खोड्या व इतर चारोळ्या", हे चारोळ्या सदर सुरु करीत आहे. 

     मित्रानो, बालपणी कृष्ण खोडकर होता हे सर्वाना वाचून माहित असेलच. तर या त्याच्या खोड्यानी, साऱ्या गोकुळात त्याचे नाव खोडकर कान्हा असेच पडले होते. विशेष करून, गोपी-गौळणींची खोड काढण्यात, त्यांची मस्करी करण्यात कान्हाला धन्यता वाटत असे. खोड काढायची आणि हळूच तिथून पळून जायचे, आणि दुरूनच त्यांची गम्मत पाहायची, असा त्याचा दिनक्रम हा ठरलेलाच असायचा. खोड काढल्याशिवाय, त्याच्या दिवसाची सुरुवात, आणि संध्याकाळ होतच नसे.

     तर कृष्णाने आपली खोड काढली, आणि कुठेतरी दडी मारली, याचा कांगावा करीत शेवटी त्या साऱ्या गौळणी, नंद-वाड्यात यायच्या, आणि माता यशोदेला कान्हाचे नाव सांगायच्या. त्याची तक्रार करायच्या. पण खरं म्हणजे, त्या गौळणींना कान्हाच्या या प्रेमळ खोड्या खूपच आवडायच्या, वरकरणी त्या जरी दाखवत नसल्या, तरी हा खोडकर बाळ-कान्हा त्यांना मनापासून आवडायचा. त्यांना माहित असायचे, की कान्हा कुठे लपलाय ते, पण बळेबळेच खोटं खोटं यशोदे मातेस त्याची ही खोडीची प्रेमळ तक्रार करायच्या, व म्हणायच्या यशोदे बघ तुझ्या लबाड कान्हान पुनः आमची खोडी काढली. मग यशोदा माताही खोटं खोटं हसून, त्यांची ही तक्रार पुन्हा नजरेआड करायच्या. असे रोजच घडायचे. तर ऐकुया या खोडकर कान्हाची खोडकर चारोळी .

                                       चारोळी क्रमांक-१
                                      -----------------

(१)

"खोड" काढुनी, कुठे लपलासी
नाव तुझे सांगते यशोदेसी
"गौळण" गोकुळची अनुरागें वदली,
"कान्हाने" माझी "खोडीच" काढली.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2021-सोमवार.