II जय श्री कृष्ण II- II दही हंडीच्या हार्दिक शुभेच्छा II-"गोविंदा रे गोपाळा"

Started by Atul Kaviraje, August 31, 2021, 11:43:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II जय श्री कृष्ण II
                         II  गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा II
                           II दही हंडीच्या हार्दिक शुभेच्छा II
                      --------------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज 31 ऑगस्ट,२०२१ चा पावन दिवस, म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमी व गोपाळ काल्याचा पवित्र दिन. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी भावांस, आणि कवयित्री बहिणींस, या गोकुळाष्टमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. ऐकुया "हमाल दे धमाल" या चित्रपटातील, गोविंदावर एक गाजलेले गाणे , या दही हंडी गाण्याचे बोल आहेत- "गोविंदा रे गोपाळा"


                                   दही हंडी गीत
                                चित्रपट गीत क्रमांक-१
                                 "गोविंदा रे गोपाळा"
                               --------------------
                       

बोल बजरंग बली की जय,
बोल बजरंग बली की जय.

गोविंदा रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका
पुढं वाकू नका,
दोन पैसे देतो मला भिजवून टाका.

लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला,
जीव झाला वेडा.

तुझ्या घरात नाही पाणी घागर
उताणी रे गोपाळा
तुझ्या घरात नाही पाणी घागर,
उताणी रे गोपाळा.

एक-दोन-तीन-चार
हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक-दोन-तीन-चार
हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला,
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला.

कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
तुझी माझी कशी जमल जोडी
मला ठाऊक हाय गो
तुझी माझी कशी जमल जोडी
मला ठाऊक हाय गो
तुझी माझी नाही जमणार जोडी,
मला ठाऊक हाय रं.

अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
पदर नाही खांद्यावर
हे तुझ्या पदर नाही खांद्यावर
दोन पैसे दोन पैसे देतो तुला देतो तुला
तुझ्या मडक्यातला लोणी दे गो या कृष्णाला
लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला
कृष्णा ठाऊक तुला,
फुकटचा ताप नको या राधेला.

अगं आज तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ
अगं आज तुझी माझ्याशी गाठ,
नको फिरवू तू पाठ, तुझा फोडीन मी माठ.

लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला,
जीव झाला वेडा.

एक-दोन-तीन-चार
हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक-दोन-तीन-चार
हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला,
गोविंदा आला रे आला तो हमालरेपुरेवाला.

डोईवर बोजा म्हणजे मडक तुरा
राधेच्या वाटे नको जाऊ चोरा
अरं जन्माला घातलंस, उघड्यावर टाकलंस
राजाला मिळतोय निवारा
अरं जन्माला घातलंस, उघड्यावर टाकलंस,
राजाला मिळतोय निवारा.

ए निळू भाऊ निळू भाऊ हो बाजूला
चल जा हो बाजूला
खुटाशी गोळी नाहीतर देईन तुला
अरे हट अरे हट नाही जमणार तुला
जमणार नाही तुला,
फुकटचा ताप नको या बापाला.

ज जा रं काका, फिरवू डोका
बघतोय या नाका
जा जा रं काका, फिरवू डोका,
बघतोय या नाका.

लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला,
जीव झाला वेडा.

एक-दोन-तीन-चार
हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक-दोन-तीन-चार,
हमालपुऱ्यातली पोरं हुशार..

गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला,
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला.

अरे बोल बजरंग बली की जय,
बोल बजरंग बली की जय.


                       =====================
                              दही हंडी गीत :गोविंदा  रे  गोपाळा 
                              चित्रपट :हमाल  दे  धमाल
                              गायक :अशोक  हांडे
                              डायरेक्टर :पुरषोत्तम  बेर्डे
                       =====================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लैरिकस क्रेझ .कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2021-मंगळवार.