आई

Started by indradhanu, March 25, 2010, 12:52:09 AM

Previous topic - Next topic

indradhanu

रणरणत्या ऊन्हात जशी झाडाची सावली
तशी तुमची नि माझी प्रत्येकाचीच माउली
देवालाही लागे इथे शेंदराचा रंग
मातृत्वाला लागतो का कुठला तो रंग?
परिसाच्या शोधामागे धावे दुनिया सगळी
आई असते का सांगा परीसाहून वेगळी?
प्रत्येकाच्या आईमध्ये पहा 'जिजाई' असते
भाग्य शिवबासारखे आपल्या नशिबात नसते
नको सोन्याचा बिछाना नको रेशमी चादर
तिचा तो पदर सार्या जगात सुंदर
देवा तुझा मोठेपणा मला कबूलच नाही
तुझ्याहून सुखी आम्ही..तुला कुठे आहे 'आई'?
मातृत्वाचे मोठेपण देवालाही त्या पटले
आईसाठी बिचाऱ्याला लहान व्हावेसे वाटले
सात आश्चर्याहूनही श्रेष्ठ आईची किमया
तिच्या एका गर्भाने सारी घडली दुनिया...

gaurig

Khupach chan........Agadi khare........Apratim........

सात आश्चर्याहूनही श्रेष्ठ आईची किमया
तिच्या एका गर्भाने सारी घडली दुनिया...

amoul

chhan aahe!! aavadali kavita

PRASAD NADKARNI