वास्तव, श्रीमंत चारोळ्या-" घोळ मासा जाल्यामंदी गावला,आज आम्हाला कुबेरच पावला"

Started by Atul Kaviraje, September 03, 2021, 02:38:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कालच म्हणजे दिनांक-०१.०९.२०२१,बुधवार रोजी, बीबीसी न्युज मराठी या यु - ट्यूब चॅनेल वर एक व्हिडीओ दाखविण्यात आला होता, की  पालघर येथील कोळी बांधवाना, खोल समुद्रात मासेमारी करताना चक्क, बहुमूल्य असे घोळ मासे त्यांच्या जाळ्यात अडकले होते. अत्यंत बहुमूल्य, बहुमोली, औषधी तत्त्वांनी, आणि गुणधर्मानी युक्त अश्या या घोळ माश्याना देशभरात, व परदेशातही मागणी असते. त्यासाठी व्यापारी हे कितीही बोली लावण्यासाठी तयार असतात.

          तर सांगायचा  मुद्दा हा की , कोळी बांधवांच्या जाळ्यात एकूण १५७ घोळ मासे सापडले होते, व त्यांची बाजारात एकूण किंमत  ही अंदाजे १ कोटी तेहेत्तीस लाख (रुपये-१,३३,००,०००/-) इतकी आहे. म्हणजे एका  घोळ माशाची किंमत ही रुपये-८४,७१३/- इतकी मोजली गेली आहे. सांगायला नको, की कोळी बांधवाना ही जणू लौटरीच लागली आहे. असो, ऐकुया, काही मजेदार, वास्तव, या घोळ माशाप्रमाणेच श्रीमंत  चारोळ्या.


                       विषय : जाल्यात गावले घोल (घोळ) मासे
                           मजेदार, वास्तव, श्रीमंत चारोळ्या
           " घोळ मासा जाल्यामंदी गावला,आज आम्हाला कुबेरच पावला"
                                      (भाग-१)
         --------------------------------------------------------


(१)
रत्नाकराने रत्नाचे भांडार उधळीले
सहस्त्र-करे "घोळ"-मत्स्य दान दिले
तोचि एक-उदारु ,त्यासम नच-कोणी,
भरूनची पावले, बांधव "कोळी". 

(२)
आम्ही डोलकर-डोलकर दर्याचे राजे
म्हणीत "कोलियांनी" समुद्र वल्हविला
अन जाळ्यात "घोळ" -सोने पकडून,
बायकांना सुवर्णाचा हंडा दिला.

(३)
सुवर्णही  फिके पडले होते
'घोळ" माश्यांच्या रुपेरी वर्खाने
शिंपल्यातला मोतीही काळवंडला होता,
"घोळ" माश्याच्या अति-प्रभा फाकेने. 

(४)
माशांचा राजा "घोळ" मासा
औषंधाची खाण "घोळ" मासा
श्रीमंतीचे वरदान "घोळ" मासा,
"कोळीयाना" देवासमान "घोळ" मासा.

(५)
"कोळ्यांचा" वेष परिधान करून
वस्तीत, घोळ-श्रीमंत आई-बाबा शोधतोय
कुणी दत्तक घेता का-हो ?,
म्हणत सारा "कोळीवाडा" फिरतोय !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2021-शुक्रवार.