पेरले ते उगवले !!!

Started by Ashok_rokade24, September 03, 2021, 04:33:04 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

मरणासी न उरले काही बंधन , 
जगण्याचे बहाणे सारेच सरले ॥

कुणी चिरे गळा माणुसकीचा,   
तेज हे धनाचे सत्य इथे हरले ॥

जाती धर्मात मानवता हरवली ,
वादळअन्यायाचे सौख्य न ऊरले ॥

संकटआसमानी निसर्ग कोपला ,
पोट रिकामे नयनी अश्रू भरले ॥

वनवा महामारीचा हात छाटले ,
चिंतेची पेटली चिता कैक जळाले॥

रणकंदन हे वर्चस्वाचे माजले ,
त्रस्त हे जीवन संकटाने घेरले ॥

कुणी न कुणाचे भुकेले स्वार्थाचे ,
तेच उगवले जे आपण पेरले ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई .