वास्तव मार्मिक चारोळ्या-"दगडाला दुधाचा अभिषेक केला, त्यात आम्ही देव पाहीला !"

Started by Atul Kaviraje, September 05, 2021, 02:59:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

           विषय : दगडाला दुधाचा अभिषेक करून आंदोलन
                     वास्तव मार्मिक आंदोलन चारोळ्या
       "दगडाला दुधाचा अभिषेक केला, त्यात आम्ही देव पाहीला !"
                                (भाग-१)
     -------------------------------------------------------


(१)
मानलं तर "देव", नाहीतर "दगड"
पण श्रद्धाळू भरलेत जगतात रग्गड
कुणीतरी रंगाऱ्याने उरलेला रंग "दगडास" फासला,
अन "दगडातून" "देव" जन्माला आला.

(२)
अनोखे आंदोलन आजवरी नाही पाहिलें
रांगेत घेऊन उभे जन "दुधाचे" पातेले
देऊळ उघडा, आम्हाला "देव" दाखवा म्हणत,
साऱ्यांनी "दगडास" "दुधाने" न्हाऊ घातले.

(३)
देवळातील "देव" बंद दाराआडून पहातोय
"दगडाच्या" कौतुकाने मनोमन असूयेने जळतोय
विचारतोय, माझा "दुग्धाभिषेक" का बंद केला तुम्ही ?
त्या "दगडालाच" कसं "देव" मानलंय तुम्ही ?

(४)
'दगडोबा" आज नटून बसले होते
त्याचे पुण्य फळा आले होते
एकीकडे दुर्लक्षित बसून होता आजवर,
त्याला आज "दुधाचे" दिवस आले होते.

(५)
रस्तोरस्ती "दुधाच्या" गाड्या लागल्या  होत्या
धंदा "दुधाचा" तेजीत चालला होता
घरोघरी चहासाठी बोंबाबोंब होत होती,
सारे "दूध" "दगडच" पीत  होता.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.09.2021-रविवार.