खुसखुशीत मार्मिक मोबाईली चारोळ्या - "सारे घर केलयं काबीज मोबाईलने"

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 02:32:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                 खुसखुशीत मार्मिक मोबाईली चारोळ्या
                  "सारे घर केलयं काबीज मोबाईलने"
                                  (भाग-2)
               ------------------------------------


६)  मोबाईल झालाय माझा सच्चा दोस्त
     त्याच्याशिवाय मला चैनच पडेना
     घरभर साऱ्या सोबत असतो माझ्या तो,
     रात्रीही माझ्या कुशीतच गाढ झोपतो ( सायलेंट मोड ).

७)  वर्षातून एकदाच आमच्यात संभाषण होते
     तोवर कितीतरी गोष्टी गेलेल्या असतात घडून
     हात चोळीत बसण्याची येते तेव्हा पाळी,
     जेव्हा सच्चाई घालते गोंधळ रडून-ओरडून.

८)  मोबाईलचे झालेय घर सारे गुलाम
     चिमुकल्या खेळण्या, तुला आहे सलाम
     एवढुसा जीव, पण पंजा लढवतो भारी,
     फिरवून फिरवून बधिर झालीत बोटे सारी.

९)  बाहेर जाणे नाही, नातलगांना भेटणे नाही
     घरात कोंडून घेतलाय मी अक्षरशः
     समाज म्हणतोय,याला झालीय मोबाईलची लागण,
     याच्यापासून साऱ्यानी आता दूर राहा.

१०) सारे घर केलयं काबीज मोबाईलने
     नात्यातला दुरावा चाललाय वाढत
     हळू-हळू विसर पडून आप्त-स्वकीयांचा,
     पाळी आलीय म्हणण्याची,आम्ही तुम्हाला नाही ओळखत !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.