II“बैल पोळा”II - लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 11:37:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II"बैल पोळा"II
                                    लेख क्रमांक-2
                                 ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-सोमवार म्हणजे, ०६.०९.२०२१, चा दिवस दोन महत्त्वाचे  विशेष असे पर्व, सण घेऊन आला आहे, ते म्हणजे, पिठोरी अमावस्या, आणि बैल पोळा. या, चला जाणून घेऊया, या दोन दिवसांचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत कथा, कविता आणि बरंच काही.

                           बैल पोळा मराठी माहिती –

     श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते तर त्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण. कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याला बैलपोळा किंवा बेंदूर म्हणतात कर्नाटकाच्या काही भागात करुनुर्नामी म्हणतात.

     या दिवशी बैलांना शेतकरी भल्या पहाटे आंघोळ घालतात त्यांना खूप सजवतात घरात पुरणपोळी, करंजी, कापणी, शंकरपाळी असे विविध गोड पदार्थ बनवले जातात.
बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेतकरी करून घेत नाही.
बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते. सर्व जनावरांना पुरणपोळी बनवली जाते.
काही दाण्यांची खिचडी ही (घुगर्या), पुरण पोळी बरोबर जनावरांना देतात.
त्या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात असतात त्यांच्याकडे महिला येतात आणि मातीच्या बैलाची पूजा करतात.

     फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करतात बैलाविषयी अनेक कथा कविता चित्रपट आणि लेखही प्रसिद्ध आहेत.या बैल पोळा बेंदूर सणाच्या निमित्ताने प्राण्याविषयी आपल्या मनात प्रेम आणि आपुलकी वाढते. ते आपण चिरंतन ठेवूया शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन आहे.  आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व समजून घेऊ यात आणि त्यांना त्रास न देता नेहमी आनंदी ठेवूया.

     तर मित्रांनो पोळा या विषयावर बोलणार आहोत याच्याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे बैलपोळा काय असतो? आणि कसा साजरा केला केला जातो महाराष्ट्र ते आज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बैलपोळा हा एक महाराष्ट्रातील सण आहे किंवा बैल पोळा श्रावण अमावास्या साजरा करण्यात येणार आहे ृतज्ञता व्यक्त करणारा एक मराठी आहे ज्यांच्याकडे नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात भारतासारख्या शेतीप्रधान देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे

                        बैल पोळा माहिती -----

     आज आपण पोळा या सणा वर वाचन करूया. पोळा हा सण बैलाचा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो हा सण श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो या दिवशी शेतकरी बैलाची पूजा करतात.

     बैलांना कामावरून आराम मिळतो शेतकरी या सणाला उत्साही असतात ते बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर आंघोळ घालतात त्यांना चारा देतात बैलांच्या अंगावर झाल घालतात व त्यांना सजवतात बैलांना अन्नाचा नैवेद्य दिला जातो सायंकाळी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळी केली जाते.

                        बैल पोळा (कथा):-----

      मित्र हो, आज आपण पाहणार आहोत बैलपोळा ची एक हृदयस्पर्शी कथा कैलासावर शंकर-पार्वती सारी पाट खेळत होते त्यावेळी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की मी हा डाव जिंकला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाला साक्षी होता तो म्हणजे फक्त नंदी तेव्हा पार्वतीने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली.

     तेव्हा पार्वती मातेला खूप राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. मृत्यु लोकी तुझ्या मानेवर जू बसेल. तुला जन्मभर कष्ट करावे लागतील हा शाप ऐकून नंदीला त्याची चूक समजली.

     त्याला खूप वाईट वाटले त्याने देवी पार्वतीला माफी मागितली तेव्हा देवी पार्वती ने सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस देव मानून तुझी पूजा करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत आणि तेव्हा पासून हा बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीकॉर्नर .कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.