म्हणी - "आवळा देऊन कोहळा काढणे"

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 12:34:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "आवळा देऊन कोहळा काढणे"


                                       म्हणी
                                    क्रमांक -34
                          "आवळा देऊन कोहळा काढणे"
                                     (भाग-१)
                        -------------------------------



34. आवळा देऊन कोहळा काढणे
     ---------------------------

--क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
--आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.) पूर्वीच्या काळी वस्तूंची देवाणघेवाण करताना चलन करताना चलना ऐवजी वस्तूंचा वापर केला जात असे . अशा वेळेला एका छोट्याशा वस्तू त्या बदल्यात मोठी वस्तू मागणे अशी परिस्थिती निर्माण होणे . एक छोटासा आवळा देऊन त्याच्या बदल्यात मोठा कोहळा घेऊन --फसवणे .
--स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
--अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे.
--स्वार्थासाठी छोटी वस्तु देऊन मोठा फायदा करून घेणे.
--क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात स्वतःचा मोठा फायदा करून घेणे.
--किरकोळ  वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
--आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
--आपल्या फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीला छोटी वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे.
--स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे. वाक्य वापर : आवळा देऊन कोहळा काढणारे सेल्समेन एक ना एक दिवस अडचणीत येऊ शकतात.
--एखादी शुल्लक गोष्ट देऊ करून त्याबदल्यात मोठं काम/फायदा करून घेणे.
जसे मॉल किंवा दुकानात आपल्याला छापील किंमतीत अगदी नाममात्र सूट देऊन एखादी महागडी ब्रँडेड वस्तू (त्यांचामते अत्यंत वाजवी दरात) विकतात. ग्राहकाला सूट मिळाल्याचं समाधान मिळतं आणि खरा नफा होतो तो विक्रेत्यांचा!
--आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
--To throw a spart to catch a whale.
--Taking advantage of yourself for a trivial matter.

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
             ----------------------------------------------

=========================================

--https://www.facebook.com
--Sarojini Ayurvedic

-----आवळा-----
     "आवळा देऊन कोहळा काढणे" अशी म्हण प्रचारात असली तरी आवळा देणे म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती गमावणे   होय. तुळशीच्या लग्नाचे दिवस सुरु झाले की चिंचा,  बोरे, आवळे अशा  मुलांच्या आवडत्या रानमेव्याचेही दिवस सुरु होतात. आपण आई बाबा मात्र 'नको खाऊ, सर्दी खोकला होईल' म्हणून त्यांना दाटत असतो. आवळे अष्टमी ही याच दिवसात येते. आवळा हे हविष्याचे द्रव्य म्हणून ओळखले जाते.
च्यवनप्राश खाऊन तरूण झालेल्या च्यवन ऋषींची हकीकत सर्वांना माहितीच आहे.
आवळा हा रसायन कार्य करणारा आहे. रूढ अर्थाने शरीर तरूण बनविणे असा अर्थ निघत असला तरी शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म पेशींची झीज कमी करणे, degenerative changes कमी करणे असाही रसायन शब्दाचा अर्थ होतो. अर्थात च्यवन प्राशाच्या खपाने अनेक औषधी कंपन्या गब्बर झाल्या असल्या तरी खात्रीशीर च्यवनप्राश घ्यावा. च्यवनप्राश अनेक स्वरूपात उपलब्ध आहे. granules , chewable tabs , chocklets अश्या स्वरूपात असले तरी पारंपारिक पद्धतीने तयार केलेला जास्त परिणामकारक ठरतो.
     आवळा हा 'परं वृष्य' सांगितलेला आहे. च्यवनांसारख्या म्हाताऱ्या ऋषींना याच्या सेवनाने कामशक्ती मिळाली असे वर्णन आढळते.
आमलकी या नावाने त्रिफला चूर्णातील महत्त्वाचे द्रव्य असणारा हा आवळा पाच रसांनीयुक्त आहे. त्यामध्ये लवण रस नाही.  शरीरातील पचनास हा उत्तम मदत करतो. थंड असल्याने पित्तशामक आहे. आम्लपित्त, आंबट ढेकर येणे यावर उत्तम उपयोग होतो. घरगुती उपचारात पित्तावर मोरावळा देतात हे आपल्याला माहितीच आहे. केसांच्या तक्रारी, केस पांढरे होणे, गळणे, यावर याचा चांगला उपयोग होतो. सिद्ध तेलांमध्ये याचा उपयोग करतात.
     शरीरातील पित्ताचे व्याधी यावर याचा चांगला उपयोग होतो. यकृताचे व्याधी यावरही उपयोग होतो. मधुमेहावर आवळा वाळवून केलेले आवलाकाठीचे चूर्ण आणि दारूहळद यांचा चांगला उपयोग होतो. अर्थात वैद्यकीय सल्ल्यानेच याचा वापर करावा.
व्हिटामिन क आणि antioxidants भरपूर स्रोत असणारे हे फळ आहे.  हिवाळ्यात निसर्ग मानवाला शक्ती प्रदान करीत असतो. त्या शक्तीस्वरूप मिळालेले हे आवळा फळ नवजीवन देते.
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.