II“बैल पोळा”II - कविता क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 12:57:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II"बैल पोळा"II
                               कविता  क्रमांक-2
                             -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-सोमवार म्हणजे, ०६.०९.२०२१, चा दिवस दोन महत्त्वाचे  विशेष असे पर्व, सण घेऊन आला आहे, ते म्हणजे, पिठोरी अमावस्या, आणि बैल पोळा. या, चला जाणून घेऊया, या दोन दिवसांचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत कथा, कविता आणि बरंच काही.

                                  बैल पोळा कविता     
                                  कविता  क्रमांक-2
                                -------------------

1. सण बैलांचा
आज पोळा
गोठ्यातील बैल न्हाऊ घाला
मखमली झुली रंगीत शिंगे
कपाळी बांधली रेशीम बाशिंगे
धवळ्या पवळ्या सजले-धजले
गावभर बघा मिरवू लागले
आजच्या दिनी
नाही कामधाम
पुरणपोळी खाऊन.

--मस्त आराम- धोंडीराम सिंह राजपूत
=========================================


2. आला आला सण पोळा
सण हा मराठ मोळा
पुरणपोळीचा नैवैद्य
सर्जाराजाला दावा
एक दिवस मायेचा
वर्षे कष्टात जायचा
आज आहे द्यायचा
गोड नैवेद्य खायचा
त्याला नटवा मिरवा
शिंगे नाजूक सजवा
बाकदार पाठीवरती
झूल मखमली बसवा
गळ्यात घंटणी माळा
पायात घुंगरांच्या वाळा
आज आहे सण पोळा
सर्जा राजाला ओवाळा.

- मर्ढेकर
=========================================


3. रंगी- बेरंगी रंगानी
नटवले सारेच बैल
पाऊसही बरसला
हर्ष झाला सैल
पोळ्यासह पावसामुळे
आनंदाने मन हसू लागले
बैलांच्या या सोहळ्यात
माणसं खुशं दिसू लागले.

=========================================


4. शिंगे रंगविली, बांशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनदार
राजा प्रधान, रतन, दिवाण
वजीर, पठाण,तुस्त मस्त
वाजंत्री वाजती,लेझीम खेळती
मिरवती नैती,बैलांलागी
डुल डुलतात,कुणाची वशिंडे
काही बांड खोडे अवखळ
कुणाच्या शिंगाना बांधियले गोंडे
हिरवे, तांबडे, शोभिवंत
वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा
सण बैलपोळा, ऐसा चाले.

=========================================


5. झुलींच्या खालती, काय नसतील,
आसुडांचे वळ उठलेले?
बैल पोळ्यांचा सण
नसे आज जुंपण
त्यास सजवून
आणावं मिरवून
बैला आंघोळ घालून
रंग अंगी लावून
खांदा मळून
काव हळदं लावून
शिंगे तासून
हिंगुळ बेगिड लावून
टोंकी शेव्या बसवून
चौरी लटकवून
गळ टाकून मढवून
चंगाळी मनी बांधून
पितळी तोडा बांधुनी
कंडा गळी गुफूंन
नाकी बेसनं घालुन
म्होरकी घालू नवीन
मस्तकी बांशिंग बांधून
झुली पाठी पांघरुन
मोरवी दिवा हुंगुनी
गोड तेल पाजूनी
पुरणपोळी नैवेद्य दावून
पुजा करील सुवासिन.
=========================================


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम) 
                     -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.