II“बैल पोळा”II - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 01:00:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II"बैल पोळा"II
                                   लेख क्रमांक-3
                                ------------------
             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-सोमवार म्हणजे, ०६.०९.२०२१, चा दिवस दोन महत्त्वाचे   विशेष असे पर्व, सण घेऊन आला आहे, ते म्हणजे, पिठोरी अमावस्या, आणि बैल पोळा. या, चला जाणून घेऊया, या दोन दिवसांचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत कथा, कविता आणि बरं

    शेतकऱ्यांसाठी शेतात राबून मातीचे सोनं करणारा बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा खरा साथी. अगदी कोणत्याही काळात त्याची साथ न सोडणाऱ्या अशा साथीदाराचा एक दिवस हा खास त्याच्या विश्रांतीसाठी असतो. श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला वेगवेगळ्या प्रदेशानुसार बैलांचा सण 'बैलपोळा' साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बैल पोळा माहिती मराठीतून घ्यायची असेल तर अगदी थोडक्यात सांगायचे तर बैलपोळा हा खास शेतकऱ्यांसाठीचा सण आहे. या दिवशी बैलांकडून कोणतीही काम करुन घेतली जात नाही. तर त्यांना छान नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. आजचा दिवस हा त्यांचा असल्यामुळे त्यांच्या सेवेत कोणतेही कमी केली जात नाही.  या दिवशी शेतात राबणाऱ्या या बैलांना आराम मिळावा म्हणून  बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने  शेकले जाते. यालाच अनेक ठिकाणी 'खांद शेकणे' असे म्हणतात. त्यानंतर बैलांना सजवले जाते.  बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झुल घातली जाते. त्यांच्या अंगावर ठिपके काढले जातात. बाशिंग सजवले जाते, गळ्यात कवड्याच्या माळा, घुंगराच्या माळा, पायात चांदीचे तोडे घातले जाते. बैलाला खाण्यासाठी या दिवशी गोडधोड पदार्थ देखील करतात. या दिवशी खास पुरणपोळीचा बेत केला जातो. शिवाय बैलाची राखण करणाऱ्या माणसाला देखील या वेळी खास कपडे दिले जातात.  अशाप्रकारे हा दिवस साजरा केला जातो. बैल पोळा माहिती मराठी तून घेतल्यानंतर आता या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश  शोधून काढले आहेत. तुम्ही हे बैल पोळा स्टेटस  तुमच्या शेतकरी बांधवांना पाठवू शकता.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम) 
                     -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.