"Serial Title Tracks "-झी मराठी-शीर्षक गीत-क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 02:26:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "Serial Title Tracks " - या विषय अंतर्गत आज ऐकुया, झी मराठीवरील एक सीरिअल-"अवंतिका ", या मालिकेचे, शीर्षक गीत.


                                  शीर्षक गीत-क्रमांक-2
                                ----------------------

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहीतरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका

उगवले आहे इथे हे झाड पाण्याचे
आसवांना तीच वेडी सांडते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.