II“बैल पोळा”II- बैल पोळा स्टेटस

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 02:54:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II"बैल पोळा"II
                                      बैल पोळा स्टेटस                 
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-सोमवार म्हणजे, ०६.०९.२०२१, चा दिवस दोन महत्त्वाचे   विशेष असे पर्व, सण घेऊन आला आहे, ते म्हणजे, पिठोरी अमावस्या, आणि बैल पोळा. या, चला जाणून घेऊया, या दोन दिवसांचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत कथा, कविता आणि बरंच काही.

                              बैल पोळा स्टेटस-----
                           

बैल पोळाच्या दिवशी खास स्टेटस ठेवण्याचा विचार असेल तर आम्ही काही खास स्टेटस देखील निवडले आहेत. चला जाणून घेऊया हे खास स्टेटस----


कृषीप्रधान संस्कृतीमधल्या सगळ्यात महत्वाचा उत्सव बैलपोळा...
     बैल पोळा हार्दिक शुभेच्छा !

कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला,
     बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा,
     बैल पोळाच्या शुभेच्छा!

शेतात राबणारा माझा कष्टकरी तो मित्र,
माझा सच्चा दोस्त म्हणजे माझा बैल,
     बैल पोळ्याच्या शुभेच्छा!

कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा घटक म्हणजे बैल..
     बैल पोळ्याच्या शुभेच्छा !

आजचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा..
बळीराजाचा मित्र आमच्या बैलाला पुजण्याचा,
     बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतामध्ये राबणारा माझा बैल,
तुझा मिळू दे उदंड आयुष्य,
     बैल पोळ्याच्या शुभेच्छा!

नको फास लावू गळा बळीराजा,
आपुल्या गळा,
दे वचन तू मला,
तुझ्या पाठीशी मी आहे कायम,
म्हणतो माझा लाडका बैल,
     बैल पोळ्याच्या शुभेच्छा!

वाडवडिलांची पुण्याई,
म्हणून केली शेती,
     तुम्हाला सगळ्यांना बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळा सणाच्या तुम्हाला सगळ्यांना आणि सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा!


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम) 
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.