ऊसाचा रस विक्रत्याचे मनोगत - " माझ्या रसवंती गृही या, ऊसाचा मधुर रस प्या !"

Started by Atul Kaviraje, September 07, 2021, 02:25:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

           ऊसाचा रस विक्रत्याचे मनोगत - मधुर गोड चारोळ्या
            " माझ्या रसवंती गृही या, ऊसाचा मधुर रस प्या !"
                                  (भाग-2)
        ------------------------------------------------


(६)
आज शेतीवरच आहे मदार सारी
नाही चालत मला कोणतीही उसनवारी
कुटुंबाची आहे खूप मदत,शेतीच्या कामाला,
ऊस पहा शेतात माझ्या भरघोस उभा राहिला.

(७)
कुणीही यावे,घटकाभर रसवंती गृही बसावे
जाती-पातींचे नकोसे बंधन मी नाही पाळत
जेथे माझ्या रसाची चव कधीही नाही बदलत,
तसाच आहे मी,माझा स्वभावही कधी नाही बदलत.

(८)
मला किंमत नकोय, माणसे मी जोडतोय
गोड रसापरीच, गोड वचनांनी संभाषण करतोय
चव रेंगाळत ठेवून जिभेवर,माणसे घरी जातात,
याच ओढीने एकदा,ती पुन्हा पुन्हा येतात.

(९)
उन्हाळ्यातील रसाचा शिडकावा,थंड करून जातो
जिभेवर राहून तो अंगभर शीत तकवा फुलवीत राहतो
शीत-वर्धक,उष्णता-मारक,गुणधर्मी औषधच जणू हे,
परी मधू-मेहींनी दूर रहावे,त्यांच्या तब्येतीला घातकच हे.

(१०)
एकटे या, कुटुंबासह या,मित्रांसोबत या,कितीही जण या
कवाडे रसवंती-गृहाची नेहमीच उघडी असतील
माझ्या रसवंती गृही या, ऊसाचा मधुर रस प्या !
खुश व्हा,आनंदी रहा,मला भरभरून आशिष द्या !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2021-मंगळवार.