आजही....

Started by AjinkyaD, September 07, 2021, 09:48:06 PM

Previous topic - Next topic

AjinkyaD

मनाचा कोपरा एक आजही रिक्त आहे
आजही, तुझ्या प्रेमाची वाट पाहत आहे... 

समोर येता चेहरा तुझा,
आजही चुकतो ठोका काळजाचा
वाटते बोलावे खूप काही तुझ्याशी,
पण उपहास नको प्रेमाचा म्हणोनि
आजही, तुला दुरूनच निहारतो ...

काय हे सारे तुला कळत असेल का?
साद माझ्या काळजाची तुझ्यापाशी पोहचते का ?
भीती माझ्या मनातील तुलाही वाटते का?
माझी हि प्रेम कथा कधी पूर्ण होईल का?
कसे सांगू तुला, मला फक्त तुझी साथ हवी
पण लायक तुझ्या बनता बनता, तू मात्र दूर गेलीस....

मात्र, एक दिवस असाही येईल,
मी तुला, सारे सांगू शकेल,
मनी साठवलेले प्रेम, तुझ्यापर्यंत पोहोचवेल
निर्भीड होऊन मीही वक्त होईल,
तोवर तू नाही तर हा 'प्रेमाचा दाह', हाच माझा सोबती....

: अजिंक्य