"७ सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 07, 2021, 10:51:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-07.09.2021-मंगळवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                   "७ सप्टेंबर – दिनविशेष"
                                  -----------------------


अ) ७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
    ----------------------------

१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

१८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

१८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

१९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.

१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

१९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

२००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.
=========================================

ब) ७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
    ------------------------

१७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

१८०७: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९)

१८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४)

१८४९: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७)

१९१२: ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९६)

१९१५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)

१९२५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २००५)

१९३३: मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women's Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.

१९३४: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२)

१९३४: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१२)

१९४०: लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.

१९६७: भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म.
=========================================

क) ७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
    -------------------------

१६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.

१८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन.

१९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

१९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२)

१९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: ५ जून १९०८)

१९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन. (जन्म: २० जून १९१५)

१९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५१)
=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2021-मंगळवार.