II गणपती बाप्पा मोरया II-गणपती बाप्पा गीत-"संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा"

Started by Atul Kaviraje, September 07, 2021, 11:16:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II गणपती बाप्पा मोरया II
                                 -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     येत्या, शुक्रवारी, म्हणजे, दिनांक-१०.०९.२०२१, गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. तेव्हा चला सर्वानी मिळून उत्साहाने कामाला लागू या, आणि गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु करूया. ऐकुया तर बाप्पाच्या आगमना-प्रित्यर्थ एक गणेश भक्ती गीत. हे गाणे  लिहिले आहे, श्री मनोज यादव  यांनी आणि याला स्वर दिला आहे श्री रमन महादेवन आणि  महालक्ष्मी अय्यर यांनी. या  भक्तिपूर्ण गाण्याचे बोल आहेत - "संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा" 


                                 गणपती बाप्पा गीत
                           "संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा" 
                          ----------------------------


संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा I
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा  II

संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या, सुगंध दिला देवा
फुलाफुलातून देतो संदेश, तूआम्हाला देवा
जगावे लोकांसाठी, हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा I
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या, सुगंध दिला देवा II

जन्म लाभला आलो ,जगी दिला फुलांचा झुला
मार्गी मोक्षाच्या जरी निघालो ,जात तुझी रे फुला
या मातीला आकार दिला, शिल्पकार तू खरा
तुझा मुखी हे शब्द गवसले, गीतकार तू खरा
ऋणी तुझे आम्ही ,फुलराजा धन्य झालो देवा I
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा  II

मन सुंदर सुंदर जसा मोगरा ,सदाफुलीचा साज नाचरा
ही जाईजुई वाऱ्यासवे डोले
रातराणी ताऱ्यासवे  बोले
शेवंतीने स्वप्न सजवुया
झेंडू संगे भक्तीत रमुया
या कमळा सम निस्वार्थ बनुया
गुलबक्षीचे पार्थ बनुया
परिजातची संधी जाते
सोनचाफा बोली नाचे
या भूमीवर देवांचा तारा ,अभिमानाने अवतरला
सर्वधर्माचा तुच लाडका, भेदभाव ना तुला I
हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य धन्य देवा II

संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या, सुगंध दिला देवा
फुलफुलातून देतो संदेश, तू आम्हाला देवा
जगावे लोकांसाठी, हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला ,प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू ,फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या, रूपाचा रंग दिला देवा I
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा  II


             ==============================
               गीतकार  -मनोज यादव
               संगीतकार -रोहन प्रधान
               गायक आणि गायिका  -रमन महादेवन, महालक्ष्मी अय्यर
             ==============================   

                         

                (सौजन्य-गणपती सॉंग्स मराठी-२०२१-यु ट्यूब-निखिल पाटील)
                               (साभार-सप्तसूर लैरिकस .इन)
                             (संदर्भ-मराठी सॉंग्स.नेटभेट.कॉम)
             ----------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2021-मंगळवार.