बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून

Started by vishmeher, March 27, 2010, 12:49:07 PM

Previous topic - Next topic

vishmeher

बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..

प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..

जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जनवल तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..

दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..

जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिलविन मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..

gaurig