"कवडीमोल भाव मिळतोय फळभाज्यांना, रस्त्यावर फेकलंय टोमॅटो, ढोबळी मिरच्यांना"

Started by Atul Kaviraje, September 09, 2021, 02:27:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                विषय : ट्रक भरभरून फळभाज्या ओतल्या रस्त्यावर
                           वास्तव गंभीर व्यंगात्मक चारोळ्या
"कवडीमोल भाव मिळतोय फळभाज्यांना, रस्त्यावर फेकलंय टोमॅटो, ढोबळी मिरच्यांना
                                     (भाग-१)
--------------------------------------------------------------------------

(१)
यंदा चांगलंच पीक आलंय "फळभाज्यांचे"
लाल "टोमॅटोचे", अन हिरव्या "भोपळी मिरच्यांचे"
कुणी योग्य "भाव" देईल का त्यांना ?
की फक्त "कवडीचाच मोल" मिळेल त्यांना ?

(२)
बळीराजाच्या डोळ्यांतले पाणी खळत नव्हते
"फळभाज्यांना" शेतात मुलांप्रमाणे वाढविले होते
त्यांना आज "कवडीचाच भाव" मिळत होता,
स्वतःहून तो "फळभाज्यांना" "रस्त्यात" मुक्ती देत होता.

(३)
शेतकऱ्यांनी श्रीमंतीचे स्वप्न पाहू नये का ?
का करायची शेती, कशासाठी फुलवायचे मळे ?
अहो, आजवरी ओतलेत लाखभर स्व-कष्टाचे,
चार दोन रुपयेच त्यांस "भाव" मिळे !

(४)
विस्तीर्ण शेत, चौपदरी बागायती नजरेसमोर
हिरवेगार, झुबकेदार "फळभाज्यांचे" झाड-वेली लोम्बर
चिंतेत शेतकरी पाहतोय, आपला "भाजी" मळा,
कळताहेत त्याला, त्याच्याच जिवाच्या घोर कळा.

(५)
हिरव्या-लाल रंगाची नक्षी पसरलीय रस्त्यावर
कुण्या कलाकाराची ही MODERN ART तर नव्हे ?
"टोमॅटो", "भोपळी मिरच्याचे" अतोनात ढीग पसरले होते,
भकास नजरेने शेतकरी हे नुकसान पाहत होते !


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2021-गुरुवार.