आतुरता आगमनाची

Started by शिवाजी सांगळे, September 09, 2021, 07:16:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आतुरता आगमनाची

लागली रे आतुरता बाप्पाच्या आगमनाची
सान थोर करती तयारी तुझ्या स्वागताची...धृ

विघ्नहर्ता वक्रतुंड, लंबोदर तु विनायक
रिद्धीसिद्दीचा पती सर्वांचा बुद्धीदायक
विद्यापती सकल गणांचा तु गणनायक

शरण तुज लेकरे बाप्पा मर्त्य मानवाची
गरज आम्हा आहे आता तुझ्या कृपेची
लागली रे आतुरता बाप्पाच्या आगमनाची..१

आनंदती सारे सृष्टीही चढवी साज नवा
गोडधोड नैवैद्याने सजतोय दिवस नवा
आशीर्वाद तुज कृपेचा सगळ्यांना हवा

मनामनात भरते जत्रा तुझ्या उत्सवाची
रंगते चर्चा दहा दिवस फक्त कौतुकाची
लागली रे आतुरता बाप्पाच्या आगमनाची..२

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९