" बंदूकधारी महिला रस्तोरस्ती फिरती, पुरुषांनी पत्करलीय त्यांजपुढे शरणागती !"

Started by Atul Kaviraje, September 10, 2021, 03:01:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  विषय : सरकारने महिलांना बंदुका परवाने दिले
                            वास्तव मार्मिक विनोदी चारोळ्या
   " बंदूकधारी महिला रस्तोरस्ती फिरती, पुरुषांनी पत्करलीय त्यांजपुढे शरणागती !"
                                      (भाग-१)
------------------------------------------------------------------------


(१)
"महिलाराज" उदयोन्मुख होत आहे
अन्यायाविरुद्ध आंदोलन "महिलांनी" छेडलंय
"बंदुका" गरजताहेत, त्यांच्यावर रोखताहेत,
ज्यांनी त्यांना आजवरी छेडलंय.

(२)
पुरुषांचे दिवस गेले आता
"महिलांचे" दिवस उगवलेत आता
पुरुषांच्या खांद्याला खांदा देणारी ती,
फिरतेय एकटी, "बंदूक" ठेवून खांद्यावरती.

(३)
"रणरागिणीचा" अवतार होता माझ्या "बायकोचा"
चापावर बोट, रोख माझ्यावर दुनळीचा
कोणत्या जन्मीचा हा माझ्यावरचा सूड ?
बार काढीत होती ती ठो आवाजाचा !

(४)
T.V. वर SHOLEY PICTURE लागला होता
गब्बर-सिंग जोरजोरात हसत सुटला होता
"बायकोची" घरी जोरात  PRACTICE सुरु होती,
तिने गळ्यात चक्क "काडतुसांचा" पट्टा घातला होता.

(५)
भले "सरकारने" दिलाय "परवाना" "बंदुका" वापरण्याचा
वेशही वर दिला होता परिधान करण्याचा
पण ही होती, भारतीय संस्कृती "महिलांची",
छंद त्यांनी नव्हता सोडला आजही, साडीत मिरवण्याचा. 



-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2021-शुक्रवार.