II गणपती बाप्पा मोरया II -गणेश चतुर्थी शुभेच्छा -शुभेच्छा क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 10, 2021, 02:14:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गणपती बाप्पा मोरया II
                                       गणेश चतुर्थी शुभेच्छा
                                         शुभेच्छा क्रमांक-१
                                 --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची  गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही.

     यंदा १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी  साजरी होणार आहे. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र असलेले गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहेत. सर्व कार्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच बाप्पावर अनेकांची विशेष भक्ती आहे. गणेश जयंती निमित्त तर ही भक्ती अधिक द्विगुणित होते. सर्व गणेशभक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. मात्र यंदा कोविड-19 सावटामुळे गणेश जयंती उत्सव विशेष खबरदारी घेत साजरा करावा लागणार आहे. गणेश चतुर्थी  निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images च्या माध्यमातून शेअर करुन गणेशभक्तांना द्या खास शुभेच्छा!)


गणेश चतुर्थी  शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
गणेश चतुर्थी निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

गणेश चतुर्थी 
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे...
गणेश चतुर्थी  च्या मंगलमय शुभेच्छा!

गणेश चतुर्थी
बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरुन
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया!
गणेशचतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

गणेश चतुर्थी
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती|
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती||
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
नसानसात भरली स्फुर्ती..
गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा!


                          (साभार आणि सौजन्य-दर्शना पवार)
                             (संदर्भ-मराठी .लेटेस्टली .कॉम)
                       -----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2021-शुक्रवार.