म्हणी - "अंथरूण पाहून पाय पसरावे"

Started by Atul Kaviraje, September 10, 2021, 03:04:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "अंथरूण पाहून पाय पसरावे"


                                         म्हणी
                                      क्रमांक -35
                            "अंथरूण पाहून पाय पसरावे"
                           ----------------------------


35. अंथरूण पाहून पाय पसरावे
     ---------------------------

--आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
--आपली ऐपत पाहून वागावे जगावे.
--संस्कृतपर्यायः - विभवानुरूपम् आभरणम् I
--भोवतालची परिस्थितीचे भान ठेउनच आपल्या पुढच्या कामाचे नियोजन करावे . जर आपण झोपण्यासाठी घातलेली सतरंजी आखूड म्हणजे कमी लांबीची असेल तर आपले पाय झोपल्यावर जमिनीवर येतील हा शब्दशः अर्थ झाला .
--आपल्या उत्त्पन्नाप्रमाणे खर्च करावा असा या म्हणीचा साधा अर्थ आहे. कधीही खर्च करताना सर्वात आधी आपल्याला तेवढा खर्च करणं झेपेल का याचा विचार नक्की करावा.
--आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे.
--ऎपत पाहून खर्च करावा.
--आपल्या ऐपतीएवढा खर्च करणे.
--आपल्या ऐपतीच्या मानानेच खर्च करावा.
--ऐपतीच्या मानाने खर्च करावा.
--आपली मर्यादा जाणून कोणतेही कार्य करावे.
-- ही म्हण आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. या म्हणीचा असा अर्थ होतो, की आपण आपल्या मिळकतीनुसार अर्थात आपल्या ऐपतीनुसार आपला खर्च ठेवला पाहिजे. याचा आणखी एक अर्थ असाही होतो की आपली ऐपत, वकूब पाहून वागावे.
--आपली ऐपत पाहून वागणे.
--जसें साधन साहित्य असेल त्याप्रमाणें कृति-कार्य करावेंआदापाहून, खर्च करावा,
प्राप्ति पाहून व्यय करावा.
--Cut your coat according to your cloth.
--Spending as much as you can afford.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2021-शुक्रवार.