मार्मिक चारोळ्या- " निदर्शन चाललंय महिलांचे मूक, यात कुठेतरी दिसतेय चूक ! "

Started by Atul Kaviraje, September 11, 2021, 02:24:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        विषय : महिलांची मूक निदर्शने
                        मार्मिक विनोदी महिला चारोळ्या
        " निदर्शन चाललंय महिलांचे मूक, यात कुठेतरी दिसतेय चूक ! "
                                  (भाग-१)
        --------------------------------------------------------


(१)
जगातले नववे आश्चर्य समोर होते
सर्व कॅमेरे "महिलांवर" रोखले गेले होते
आता तरी "बोलतील" त्या तावातावाने,
म्हणून सर्वांचेच कान आसुसलेले होते.   

(२)
"महिला" आणि "मूक, अबोल, घट्ट-ओठया"
कानांवर विश्वासच बसत नव्हता ऐकून
वर्तमानपत्रात  FRONT-PAGE वर  बातमीच तशी होती,
डोळ्यांवरचा सुद्धा विश्वासच उडाला होता वाचून.

(३)
हे सर्व दाखवायचे, वरकरणी असत
पण खायचे दात काही वेगळंच दाखवून जातात
दिवसा "मुक्याने निदर्शने" करणाऱ्या "बायका", रात्री,
KITTY PARTY अन गप्पात रंगून जातात.

(४)
"बायकांना" राहावत नव्हते, कासावीस होतोय जीव
किती वेळ बांधून ठेवणार असे "ओठ घट्ट" ?
जीभ आत दातांत वळवळू लागली होती,
"शब्दांची" सजलेली वरात बाहेर येऊ पहात होती.

(५)
आज पुरुष मस्त होते गप्पात रंगलेले
आठवड्याचा एक वार त्यांचा होता ठरलेला
'बायकांना" नाईलाजाने "मूक" व्हावे लागणार होते,
तसा त्यांचा करारच होता कागदावर लिहिलेला.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.09.2021-शनिवार.