तू...

Started by Abhishek D, March 27, 2010, 06:12:15 PM

Previous topic - Next topic

Abhishek D

तू...
तू अशी...
मोहक, सुंदर, दिलखेच, वेधक......
अन मी...
मी असा...
हळवा, शांत, एकलकोंडा आणि थोडासा बावळट......
तुला वाटतं जमेल आपलं?
मला तर माझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त भरवसा आहे......
तू घेशील सांभाळून मला...
जेव्हा मी पडेन, रडेन, व्याकुळ होईन अन अडखळेन......
आणि मी...
मी तुला देईन...
विश्वास, जन्मभराची साथ, आधार आणि निखळ प्रेम......
तू जपशील माझा हळवेपणा...
मी पुरवेन तुझे सगळे हट्ट...
तू फुलवशील आपल्या नात्याला...
आणि मी... मी हसवेन तुझ्या अश्रुंना.....
या दुनियेच्या दुनियादारीत, तू मला खंबीर साथ देशील...
मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवेन...
बघ... नीट विचार करुनच निर्णय घे...
शेवटी तुझ्या सुखातच तर माझं सुख लपलयं...
तुला माहीत आहे.... तरीही परत एकदा सांगतो...
मी तुझ्यावर मनापासुन प्रेम करतो....
म्हणुनच आज धीर करुन, तुला स्पष्ट विचारतो आहे...
तू माझ्याशी लग्न करशील का?
माझ्या आयुष्याची तू, अर्धांगी बनशील का?


author unknwn