म्हणी - " आपलेच दात आपलेच ओठ"

Started by Atul Kaviraje, September 12, 2021, 04:39:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - " आपलेच दात आपलेच ओठ"


                                         म्हणी
                                      क्रमांक -37
                             " आपलेच दात आपलेच ओठ"
                            ----------------------------


37. आपलेच दात आपलेच ओठ
    --------------------------

--आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे.
--आपल्या जवळच्या माणसाने चूक केल्यावर आपलीच गोची होते.
-- आपण बोलत असताना जर चुकून जीभ चावली गेली तर आपण आपल्या दात आणि ओठांना मारतो का ? दुसऱ्यांनी कोणी इजा केली तर आपण त्याच्या अंगावर धावून जाऊ पण आपल्याच दात व ओठांना मारू काय ? नाही न ! आणि जरी मारलं तरी लागणार कोणाला ?आपल्यालाच न ! तसेच जवळच्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला शिक्षा देण अवघड होते .
--कधीकधी प्रत्येकावरच अशी वेळ येते जेव्हा एखादा कठीण निर्णय घेण्याची वेळ येते. कारण ज्याच्यामुळे ती वेळ येते तो ही आपलाच असतो. त्यामुळे दोन्हीकडून नुकसान आपलंच असतं.
--आपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे.
--आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे निर्माण झालेली अडचणीची स्थिती.
-- आपल्याच माणसाने चूक केल्यास आपण अडचणीत येणे.
--आपल्याच माणसानी केलेल्या चुकांमुळे निर्माण झालेली अडचणीची परिस्थिती.
--आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचण निर्माण होणे.
--शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यांतलाच, अशी स्थिति असते तेव्हां, भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा, शिक्षा करणाराला सारखेच जवळचे स्वकीय असल्यामुळें दोहोंपैकीं कोणाचेंही बरें वाईट करतां येत नाहीं. अशावेळीं योजितात.
स्वतःच्याच दुष्कर्माचें फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो.
--You get into trouble if your own man makes a mistake.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2021-रविवार.