म्हणी - " आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास"

Started by Atul Kaviraje, September 13, 2021, 04:29:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - " आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास"


                                         म्हणी
                                     क्रमांक -38
                           "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास"
                         -----------------------------------


38. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
     -------------------------------

--मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
--अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.
--- एखाद्या माणसाला मुळातच नवीन काम सुरु करायचा उत्साह नसेल आणि त्या वेळी त्याने चांगली वेळ , महुर्त बघून काम सुरु करायचं म्हटलं , तर फाल्गुन म्हणजे मराठी शेवटच्या महिन्यापासून कशाला सुरुवात करायची ? नवीन वर्ष सुरु झाल कि चैत्र महिन्यापासून सुरवात करू असे मनात वाटेल . थोडक्यात चालढकल करण्याची वृत्ती असल्याने काम लगेच न करता काहीतरी कारणे शोधून ते पुढे ढकलणे किंवा ढकलावे लागले अशी परिस्थिती निर्माण होणे .
--आधीच हौशीने केलेलं काम अन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे.
--मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे .
--आळशी माणसाच्या पदरी आळशी परिस्थिती निर्माण होणे.
--मुळातच आळशी व्यक्तीस अजून अनुकूल परिस्थिती निर्माण करणे.
--आधीच एखाद्या गोष्टीची हौस आणि त्यात इतरांचे उत्तेजन.
--अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी स्वभावाला पोषक परिस्थिती निर्माण होणे.
--मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.
--Laziness of a lazy man.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ----------------------------------------------

--शास्त्र सांगतं की, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला चंद्राचा जन्म महर्षि अत्री आणि देवी अनुसुयापासून झाला होता. ... त्यामुळे खरं तर जर एखादा उल्हासानं सळसळलेला माणूस समोर आला, तर अभावीतपणेच तोंडातून शब्द बाहेर पडायला हवेत, 'आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास'!


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.09.2021-सोमवार.