म्हणी - "आईचा काळ बायकोचा मवाळ"

Started by Atul Kaviraje, September 14, 2021, 02:22:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आईचा काळ बायकोचा मवाळ"


                                          म्हणी
                                       क्रमांक -39
                             "आईचा काळ बायकोचा मवाळ"
                           -------------------------------


39. आईचा काळ बायकोचा मवाळ
     ---------------------------

--आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा.
--लग्न झालेल्या पुरुषाला स्वत: च्या आईतील दोष जाणवतात व बायकोच्या स्वभावातील गुण दिसतात . आपल्या आयुष्यात नवीन माणूस आला कि आपल्याला त्या व्यक्तीचे गुण जास्त जाणवतात व जुन्या सहवासातील व्यक्तीचे दोष जास्त जाणवत राहतात . (प्रत्येक माणूस हा गुण व दोष याचं मिश्रण असतो ,कोणीही पूर्ण बरोबर नव्हे किंवा कोणीही पूर्ण चूक नव्हे .)
--आईशी वाईट वागून बायकोला महत्त्व देणे.
--आईकडे लक्ष्य न देता बायकोची काळजी घेणे.
--एखादा बायकोला मात्र भिऊन वागतो व तिच्यापुढे त्याचे काही चालत नाही. पण आईशी मात्र अरेरावीचे वर्तन करून तिला उर्मटपणाने वागून त्रास देतो त्यास म्हणतात.
--Taking care of wife ignoring mother.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2021-मंगळवार.