"१4 सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 14, 2021, 02:28:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-14.09.२०२१, मंगळवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१4 सप्टेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------

अ) १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
    -----------------------------

७८६: हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.

१८९३: सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.

१९१७: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

१९४८: दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.

१९४९: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

१९५९: सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.

१९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.

१९७८: व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.

१९९५: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

१९९७: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.

१९९९: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

२०००: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.

२००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

=========================================

ब) १४ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
    --------------------------

१७१३: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १७८१)

१८६७: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग  यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)

१७७४: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)

१८९७: नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)

१९०१: शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.

१९२१: शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)

१९२३: केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.

१९३२: रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९८६)

१९४८: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.

१९५७: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू केपलर वेसेल्स यांचा जन्म.

१९६३: अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.

=========================================

क) १४ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू
    --------------------------

८९१: पोप स्टीफन (पाचवा) यांचे निधन.

१९०१: अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८४३)

१९७९: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूर मोहमद तराकी यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९१७)

१९८९: भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०६)

१९९८: शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.

२०११: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: ५ जून १९५०)

२०१५: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2021-मंगळवार.