II गणपती बाप्पा मोरया II - लेख क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 03:11:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गणपती बाप्पा मोरया II
                                           लेख क्रमांक-6
                                   --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                          गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती-----

     अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असला तरी देखील मुंबईतील गणेशोत्सवाला आगळे वेगळे महत्व आहे. उंचच उंच आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या मुर्ती हे मुंबईत गणेशोत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्टय आहे.

     येथील आगमनाच्या आणि विसर्जनाच्या दिवशी तर विचारायलाच नको. अवघी मुंबईतील प्रतिष्ठानं त्या दिवशी बंद असतात आणि संपुर्ण मुंबापुरी केवळ गणेशमय झालेली आपल्याला दिसुन येते.

     मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती फार प्रसिध्द असुन लांबलांबुन लोक या गणेशाच्या दर्शनाकरता, नवस बोलण्याकरता आणि फेडण्याकरता येथे येतात. या गणेशाच्या दर्शनाकरता लांबच लांब रांगा लागलेल्या दिसुन येतात.

                                   गणेश विसर्जन –

     अनंत चतुर्दशी ला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं. दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होउन जातं.

     तो दिवस सगळयांकरताच मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा आणि कठीण क्षण असतो. पावलं जड होतात . . . लहानं बच्चेकंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते.

     "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" हा जयघोष आसमंतात घुमत असतो. आणि पाठमोरी बाप्पाची मुर्ती पाण्यात जातांना मनात कालवाकालव होते.

     जो उत्साह त्याच्या आगमनाच्या वेळी मनामनात ओसंडुन वाहात असतो त्याचा लवलेशदेखील त्याला निरोप देतांना आढळुन येत नाही.

            गणेशोत्सव सुरु करण्यामागे लोकमान्य टिळकांचा उद्देश –

     लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू केला होता आज तो उद्देश पुर्ण होतांना पहायला मिळत नाही. सगळीकडे मोठया आवाजात डी जे वाजवणे, बिभत्स नाचगाणी, मंडपात चित्रपट गितं वाजवणे, मोठमोठे मंडप बांधुन रोषणाई करून या पारंपारिक उत्सवाला ज्या पध्दतीने मेगा ईव्हेण्ट चे स्वरूप यावयास लागले आहे ते पाहाता लोकमान्यांना या उत्सवातुन नक्कीच हे अभिप्रेत नव्हते हे आपल्या लक्षात येते.

     सामाजिक एकोपा वाढवुन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करणे, गरजवंताना सहाय्य करणे, वक्र्तृत्व स्पर्धांचे, आणि इतर स्पर्धा आयोजित करून लोकांमधील चांगल्या गुणांचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे. तेव्हांच हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सफल होईल.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.