"प्रेम कविता"-प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही!

Started by Atul Kaviraje, September 15, 2021, 11:22:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           "प्रेम कविता"
                                         ---------------                                         

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया एक प्रेम कविता. या कवितेचे शब्द आहेत-"प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही.."


प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही........


प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही..
प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटेसे कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही...

का जीव होतो वेडा पिसा
जेव्हा येते तिची आठवण
हृदयात केलेली असते
तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...

मनाला तिच्या शिवाय
काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय
दुसरा कुठला विचार करावा
असेही कधी वाटत नाही...

रात्री छानच असतात ...
तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ...
मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही...
ते जीवनात कधी ही सब कूछ नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात
ते नेहमीच जपायच असत...

प्रेमाचे हे कोड कदाचित
कधीच कुणाला उलगडणार नाही ...
पण त्यासाठी हे जग प्रेम करायचेही
कधी थांबणार नाही.


             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीपोएम एस एस .ब्लॉगस्पॉट.कॉम)
           --------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2021-बुधवार.