विश्व ओज़ोन दिवस-"ओझोन दिन"-लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 12:23:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  विश्व ओज़ोन दिवस
                                     "ओझोन दिन"
                                    लेख  क्रमांक-1
                               --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक -16.09.2021-गुरुवार  आहे . आजच्या  दिवसाचे  महत्त्व  म्हणजे  आज "विश्व ओझोन दिवस" आहे .जाणून  घेऊया   या  दिनाचे  महत्त्व , आणि  इतर  माहिती .


              September 16-World Ozone day

To mark the day of the signing of Montreal Protocol and to spread awareness of the depletion of the Ozone Layer and search for solutions to preserve it.

     ओझोन हा वायु मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूं पासून बनलेला असून त्याचे रेणुसुत्र O3 असे आहे. शास्त्रीय द्रुष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.

                        पदार्थवैज्ञानिक बाह्य गुण-----

     ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायु असून,पाण्यात किंचीत विरघळतो.कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम अध्वृवीय द्रावक यात जास्त विरघळुन एक निळे द्रावण तयार करतो.-११२० तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे,कारण वायुरुप व तरल ओझोन मिळुन स्फोट होउ शकतो.-१९३०तापमानावर,त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.[१] बहुतेक लोकं ०.०१ पी.पी.एम. इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायु ओळखु शकतात कारण त्यास असलेला क्लोरीन सदृष्य तिव्र वास हा होय.त्याच्या ०.१ ते १ पी.पी.एम. एवढ्या हवेतील तिव्रतेने डोकेदुखी,डोळ्यांची जळजळ व श्वसनसंस्थेची जळजळ इत्यादी विकार उदभवु शकतात..[२]

     कमी पातळीच्या असण्यानेसुद्धा, प्लॅस्टिक,फुप्फुस इत्यादिंवर त्याचा विपरीत परीणाम होतो. ओझोन हा वायु, चुंबकिय क्षेत्रास विरोध करणारा आहे.एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर, तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकिपीडिया.ऑर्ग)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.