विश्व ओज़ोन दिवस-"ओझोन दिन"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 12:26:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  विश्व ओज़ोन दिवस
                                     "ओझोन दिन"
                                    लेख  क्रमांक-2
                              ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक -16.09.2021-गुरुवार  आहे . आजच्या  दिवसाचे  महत्त्व  म्हणजे  आज "विश्व ओझोन दिवस" आहे .जाणून  घेऊया   या  दिनाचे  महत्त्व , आणि  इतर  माहिती .
     
         ओझोन दिन का साजरा केला जातो, ओझोनचे महत्त्व काय?-----

     ओझोन थरविषयी लोकांमध्ये जागरूकता यावी यासाठी ओझोन दिन दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. १६ सप्टेंबर १९९५ रोजी जागतिक ओझोन दिन प्रथमच साजरा करण्यात आलाओझोन थर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करते.ओझोन थर जपण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस महत्वाचा आहे.

    World Ozone Day: दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन (ozone day) साजरा केला जातो. ओझोन थराबद्दल (ozone layer) लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी संभाव्य उपाय शोधण्यासाठी हा उपाय साजरा केला जातो. ओझोन हा ऑक्सिजन वायूच्या ३ अणूंचं संयुग आहे. जो वातावरणात अगदी कमी प्रमाणात आढळतो. ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळेच पृथ्वीचे रक्षण होत असते. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्‍या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून (The rays of the sun) पृथ्वीचे (Earth) रक्षण करते. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात.

           १९ डिसेंबर १९९४ रोजी जागतिक ओझोन दिनची झाली घोषणा----

     १९ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत  (UNGA)१६ सप्टेंबरला ओझोन थरा संरक्षण आंतरराष्ट्रीय दिन म्हणून घोषित केलं. १६ सप्टेंबर १९८७ रोजी, संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या केल्या. ओझोन थर कमी होण्यास जबाबदार असलेल्या पदार्थांचे उत्पादन कमी करून ओझोन थरचे संरक्षण करण्याचे लक्ष्य मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे आहे. १६ सप्टेंबर १९९५ रोजी जागतिक ओझोन दिन प्रथमच साजरा करण्यात आला.

                            'ओझोन फॉर लाइफ'-----

     'ओझोन फॉर लाइफ' हा जागतिक ओझोन दिन 2020 ची घोषणा आहे. यावर्षी आपण जागतिक ओझोन थर संरक्षणाची ३५ वर्षे साजरी करतो आहे. त्यामुळे ही घोषणा आपल्याला स्मरण करून देते की, पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी ओझोन महत्त्वपूर्ण आहे आणि आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी ओझोन थराचे संरक्षण करणे चालू ठेवले पाहिजे.

                     ओझोन थराचे संरक्षण करणे फार महत्वाचे-----

     ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो. परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो. जर सूर्यावरील अल्ट्रा व्हायलेट किरण थेट पृथ्वीवर पडले तर मानवाशिवाय झाडे आणि प्राणी आणि इतर जीव यांच्यावर याचा अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ओझोन थरचे जतन करणे फार महत्वाचे आहे.


                              (साभार एवं सौजन्य-रोहित गोळे)
                              (संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी .कॉम)
                          ----------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.