तिला...

Started by ghodekarbharati, March 30, 2010, 04:23:19 PM

Previous topic - Next topic

ghodekarbharati

                    तिला.......
आपण सबळ आहोत हे कळत असल्यामुळे तिला
जेव्हा अबलेसारखे वागणे नकोसे होते,
तेव्हा त्यालाही आपण कमकुवत आहोत हे जाणवत असताना,
बलदंड असण्याचा आव आणणे आवडत नाही.

गुंगी गुडिया म्हणून वागायला तिला जसे आवडत नाही,
तसे त्यालाही आपण सर्वज्ञ आहोत, अशी जी इतरांची कल्पना असते,
त्याचे ओझे वाटायला लागते.....
जेव्हा तिच्यावर भावना विवशतेचा आरोप केला जातो,
तेव्हा त्यालाही संवेदनशील, मृदू होऊन दोन अश्रू गाळण्याची मुभा नसते.

स्पर्धेत उतरणे जसे स्त्रीत्वाला शोभत नाही असे मानले जाते,
तसे आपले पुरुषत्व सिद्ध करायचा
स्पर्धा हा एकमेव मार्ग आहे, हे त्याला बोचत राहते.

आपल्याकडे फक्त लैंगिकतेच्या नजरेतून पहिले गेलेले जसे तिला आवडत नाही,
तसे त्यालाही आपले पुरुषत्व सतत सिद्ध करायला हवे, ही चिंता भेडसावत असते.

जसे तिला मुलाबालांच्यात गुरफटून स्वतःला विसरावे लागते,
तसे त्याला आपण पिता म्हणून मुले वाढवताना मिळणारा आनंद उपभोगता येत नाही

स्त्रीला जशी समान संधी किंवा समान पगार मिळत नाही,
तशी पुरुषालाही कुटुंबातील सर्वाना पोसण्याची पूर्ण आर्थिक जबाबदारी टाळता येत नाही

स्त्रीला मोटार चालवताना यांत्राविषयक माहिती आहे हे अपेक्षित नसते,
तशी पुरुषालाही पाकसिद्धीतला आनंद काय असतो, हे कुणी शिकवत नाही

जेव्हा मुक्तीच्या दिशेने स्त्री एकेक पाऊल पुढे टाकते,
तेव्हा पुरुषालाही आपला स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाल्याचे जाणवते.
('फोर एव्हरी विमेन ...' या नान्सी स्मिथ यांच्या कवितेचा अनुवाद
अनुवादक ; आशा दामले


anya.parulekar


santoshi.world

छान आहे ...... आवडले  :)

gaurig