II गणपती बाप्पा मोरया II - गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, September 16, 2021, 04:28:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गणपती बाप्पा मोरया II
                                     गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
                                           शुभेच्छा क्रमांक-7
                                   ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक,१०.०९.२०२१-शुक्रवार  म्हणजे आजपासून यंदाची गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय,उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांच्या या गणेश सणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मराठी कवितेच्या, माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनींस या गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त, जाणून घेऊया, गणेशोत्सवाचे महत्त्व, माहिती, महत्त्वपूर्ण लेख, पूजा विधी, व्रत वैकल्य, कथा, इतिहास, स्टेटस, शुभेच्छा, शायरी, कविता आणि बरंच काही. 

                                    गणेश चतुर्थी शुभेच्छा
                                 ----------------------


गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा I

*******

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा I

मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा I

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते
श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा I

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बां तू घाल पोटी
गणपती बाप्पा मोरया I

*******

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा I

देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची I

*******

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-आर के अलर्ट.इन)
              ---------------------------------------------



-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2021-गुरुवार.