"१7 सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 17, 2021, 10:58:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-17.09.२०२१, शुक्रवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१7 सप्टेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------


अ) १७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
    ----------------------------

१६३०: बोस्टन शहराची स्थापना झाली.

१९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

१९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

१९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.

१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.

२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.

=========================================

ब) १७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)

१८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

१८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.

१८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)

१९००: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)

१९०६: श्रीलंकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)

१९१४: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)

१९१५: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून २०११)

१९२२: अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो  यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९७९)

१९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)

१९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.

१९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.

१९३८: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)

१९३९: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)

१९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.

१९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.

१९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.

=========================================

क) १७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)

१९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)

१९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १९५४)

१९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२)

२००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2021-शुक्रवार.