विनोदी मार्मिक चारोळ्या-"डाव मेट्रोत रंगला जुगाराचा,तीन पत्तीचा अन मेंदीकोटचा"

Started by Atul Kaviraje, September 18, 2021, 01:40:23 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             विषय : मेट्रोत जुगाराचा डाव
                               विनोदी मार्मिक चारोळ्या
            "डाव मेट्रोत  रंगला जुगाराचा, तीन पत्तीचा अन मेंदीकोटचा"
                                     (भाग-१)
         -------------------------------------------------------


(१)
मला ते दिवस आठवलेले
मनात ते क्षण साठवलेले
COLLEGE-कट्टा कसा गजबजून जात,
"५२ पत्त्यांच्या डावात" रंगलेले.

(२)
मनोरंजन हवे, करमणूक हवी
TIME-PASS हवा, गम्मत-जम्मत हवी
"पत्त्यांसारखा" दुसरा विरंगुळा नाही !
"जुगार" याहून वेगळा नाही ?

(३)
"पत्त्यांना  जुगाराचे "नाव का ?
सारेच खेळाडू "जुगारी" नसतात
निखळ मनोरंजनाचे साधन हे,
समाज दूषित नजरेने पाहे !

(४)
'METRO-त डाव रंगलाय पत्त्यांचा"
प्रवाश्याना कसलाच गंध नाही
मी दाखवतोय सहज खेळून,
"जुगाराचा" माझा दूरदूरचा संबंध नाही.

(५)
बंदी आणलीय सरकारने खेळावर
"रेल्वे-डब्यात पत्त्यांच्या" प्रत्येक "डावावर"
सांगतोय, "जुगार" केव्हाच दिलाय सोडून !
पण ऐकतच नाही, उठलंय जीवावर !


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2021-शनिवार.