मार्मिक विनोदी चारोळ्या-"वधू हळदीत मढलीय हळदीने, चोरांच्या मनात भरलेत दागिने !"

Started by Atul Kaviraje, September 19, 2021, 02:10:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  विषय : हळदी समारंभात दागिने चोरी
                          मार्मिक विनोदी चारोळ्या
       "वधू हळदीत मढलीय हळदीने, चोरांच्या मनात भरलेत दागिने !"
                                 (भाग-१)
    ----------------------------------------------------------


(१)
समारंभ "हळदीचा",वर-"वधूला" पिवळे करण्याचा
समारंभ आनंदाचा, दिवस हर्षाचा, लग्नापूर्वीचा
चोरांना दिसतंय फक्त पिवळे-धमक सुवर्ण,
त्यांना काय पडलंय "हळदीत" देणं-घेणं ?

(२)
"हळद" लागलीय वर-"वधूच्या" अंगाला
"हळदीच्या" रूपाने नाते झाले घट्ट
"दागिन्यांची" लागलीय एकमेकांत चुरस
"दागिन्यांसाठी" होतोय "वधूचा", "वधू"-हट्ट. 

(३)
कोरोनाचे प्रस्थ वाढत चाललंय
लग्न जमावावर प्रतिबंध आलाय
म्हणून "हळदी" समारंभात "दागिन्यांवर" मारण्या डल्ला,
"चोरांचा" पहा सुळसुळाट वाढलाय.

(४)
अनुभवाने शहाणपण सर्वांनाच आलंय
नकली "दागिन्यांचे" रुखवत ठेवलंय
अन "हळदी" सुखरूप पार पाडून,
"चोरांना" रिक्त-हस्ते घरी पाठवलंय.

(५)
"चोरांनी" लग्न-घरांवर पाळत ठेवलीय
"हळदी" समारंभाचे त्यांचेकडे बुकलेटच आहे
आज इथे तर उद्या तिथे चोऱ्या,
त्यांचा अख्खा महिनाच बुक झाला आहे.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2021-रविवार.