म्हणी - "अहो रूपम अहो ध्वनी"

Started by Atul Kaviraje, September 19, 2021, 03:24:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"अहो रूपम अहो ध्वनी"

                                        म्हणी
                                    क्रमांक -42
                              "अहो रूपम अहो ध्वनी"
                              ----------------------


42. अहो रूपम अहो ध्वनी
     --------------------

--एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
--एखाद्या व्यक्तीचे /प्राण्याचे सर्वच गुण वाखाणण्यासारखे असतात .
--एकमेकांचे दोष न दाखवता खोटी स्तुती करणे.
-- एकमेकांच्या मर्यादा माहित नसताना खोटी स्तुती करणे.
--मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार-----
     उंटांच्या घरी लग्न होते तेथे मंगलाष्टके म्हणावयास गाढवे आली. तेव्हां गाढवे म्हणू लागलीः कायहो या उंटांचे सुंदर रूप! उंट म्हणू लागलेः कायहो यांचा सुंदर आवाज ! याप्रमाणें ते परस्परांची स्तुति करून सुख मानते झाले. याप्रमाणें काही लोक परस्परांची स्तुति करून संतोष मानीत असतात. या श्र्लोकांतील 'अहोरूपमहोध्वनिः' एवढा वाक्यप्रचार विशेष रूढ आहे.
--मुळीच योग्यता नसतां जेव्हां काही लोक परस्परांची प्रशंसा करूं लागतात तेव्हां म्हणतात. उष्ठ्राणांच विवाहेषु गीतं गायन्ति गदर्भाः। (उष्ठ्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः)। परस्परं प्रशंसंति अहो रूपमहो ध्वनिः।।
--False praise on the contrary without showing limits to each other.

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ------------------------------------------

--'अहो रूपं, अहो ध्वनी', ह्या संस्कृत वाचनाचा अर्थ स्पष्ट करतांना सुभाषितकाराने दिलेला दृष्टांत उल्लेखनीय आहे. तो दृष्टांत असा आहे... एका माकडाच्या लग्नात गाढव मंगलाष्टकं म्हणतांना माकडाकडे पाहून म्हणाले, 'अहो रूपं'। तेव्हा माकड गाढवाची मंगलाष्टकं ऐकून म्हणाले, 'अहो ध्वनी'। एकाचे रूप चांगले नाही तर दुसऱ्याचा आवाज; तरीही ते एकमेकांना चढवत असतात. थोडक्यात काय तर दोन्हीही बेंगरुळ आणि बिनडोक माकडचाळे आणि लाथा झाडण्यापलिकडे काहीच न करता आल्यामुळे  'तू माझी पाठ खाजव मी तुझी पाठ खाजवतो', याप्रमाणे एकमेकांची स्तुती करून भांग प्याल्यासारखे बरळू लागतात. सध्या अंधभक्तही असे वागत तीर मारल्यासारखे दाखवून विद्वात्तेचा मोठाच आव आणत आहेत. बिच्चारे!!!

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ फेसबुक.कॉम)
                       ----------------------------------------

                                      "अहो रुपम अहो ध्वनि"
                                              कविता
                                    ------------------------   

मुळ संस्कृत श्लोक-----

उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि
परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि
-------------------------------------

उंटाच्या लग्नात जमला
सार्‍या गाढवांचा मेळा
वर्णीती ते वधू वरा
मोठा काढूनीया गळा
गाढव बोले उंटा
तुझे रूप काय वाणू
मदनाचा तू पुतळा
महती काय जाणू
ऐकूनीया ते बोल उंटा
आला गाढवाचा लळा
मिठी मारली त्याने
त्या गाढवाच्या गळा
मधूर आवाज तुझा
जसा कोकीळेचा सूर
घेता मधूर तान तू
माझा फाटला रे उर
स्तुतीसाठी स्तूती
ही बुध्दी खोटी
रत्नपारखीच जाणो
हिरा की गारगोटी.

               कवी -हरीश दांगट
              ------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2021-रविवार.