II गणपती बाप्पा मोरया II - गणेश विसर्जन मैसेज

Started by Atul Kaviraje, September 19, 2021, 03:51:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गणपती बाप्पा मोरया II 
                              IIअनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा II
                                       गणेश विसर्जन मैसेज
                            ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १९ सप्टेंबर, २०२१-रविवार, आज बाप्पा आपल्या गावी परत चालले आहेत. आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. १० दिवस कसे भुरकन उडून गेले, ते कळलेच नाही. आजच्या अनंत चतुर्दशी दिनाच्या सर्वाना शुभेच्छा.  बाप्पांची वाट पाहूया, ते पुढील वर्षी पुन्हा आपल्या भेटीस येणारच आहेत, तोपर्यंत आपल्या दिनक्रमात आपले मन गुंतवूया. वाचूया, तर या दिनाचे महत्त्व, माहिती, शुभेच्छा, आणि इतर बरंच काही.


                                 गणेश विसर्जन मैसेज
                               ---------------------

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना..

रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो "मोरया" तुझ्यामुळे..!

दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
!!गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2021-रविवार.