II कोळीगीत II - " नारलान पाणी नाव देवाचं घ्या"

Started by Atul Kaviraje, September 19, 2021, 07:18:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II कोळीगीत II
                                        गीत क्रमांक-2
                                     -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया माझ्या कोळी बांधवांचे एक गाजलेले, लोकप्रिय गीत. या कोळी-गीताचे बोल आहेत- " नारलान पाणी नाव देवाचं घ्या"


                                          कोळीगीत
                              " नारलान पाणी नाव देवाचं घ्या"
                             -----------------------------

कोळीगीत " नारलान पाणी नाव देवाचं घ्या"-----

नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या

येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या

एक नारळ दिलाय येताळ देवाला
एक नारळ दिलाय येताळ देवाला
कोळ्याचं जीवन तुझा सेवेला र
कोळ्याचं जीवन तुझा सेवेला र
देवा तू धाव माझे हाकेला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

एक नारळ दिलाय दर्या देवाला र
एक नारळ दिलाय दर्या देवाला
वरसाचा मान देव नारली पुनवेला र
वरसाचा मान देव नारली पुनवेला
सोन्याचा नारळ वाहुनशी तुला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

एक नारळ दिलाय सातीव बहिणींना र
एक नारळ दिलाय सातीव बहिणींना
डोली बांधुशील वाटले कवींना र
डोली बांधुशील वाटले कवींना
पाच खांड दिलंय तुमचे पूजेला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

एक नारळ दिलाय एकविरा आईला र
एक नारळ दिलाय एकविरा आईला
नवसाचा कोंबरा वाहुंशी तुला र
नवसाचा कोंबरा वाहुंशी तुला
सणावारी येतां तुझा भेटीला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

एक नारळ दिलाय खंडू देवाला र
एक नारळ दिलाय खंडू देवाला
बानू नि मालसा तुझे संगतीला र
बानू नि मालसा तुझे संगतीला
भंडारा उरवूदे जेजुरी नगराला
खंडेरी डोंगर भाराविला
येताळ देवा तुला मी पाहिलंय
खंडेरी डोंगर भाराविला

नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या
नारलान पाणी नाव देवाचं घ्यार
नारलान पाणी नाव देवाचं घ्या

              =======================
                   गायक : अरुण  जंगले व शकुंतला  जाधव
                   संगीत : अरुण  जंगले
                   गीतकार : अरुण  जंगले
              ========================

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-यू ट्यूब.कॉम)
                     ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2021-रविवार.