II निबंध-लेखमाला II-निबंध क्रमांक-१-माझा भारत देश (भाग-१)

Started by Atul Kaviraje, September 20, 2021, 05:36:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II निबंध-लेखमाला II
                                    -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून, निबंध-लेखमाला सुरु करीत आहे, निबंध-लेखमाला या मथळयI-अंतर्गत, सादर करीत आहे, (निबंध क्रमांक-१), आजच्या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा भारत देश"

निबंध  विषय-----
------------

1) माझा भारत देश (भाग-१)-----
--------------------------

     भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. अशा ह्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये विविध जातीचे, धर्माचे, संप्रदायाचे लोक आनंदाने राहतात. भारत देश हा भारतीय संस्कृती साठी आणि येथील विविधतेसाठी जगभर ओळखला जातो. माझा भारत देश महान हे आम्ही ह्या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा माझा भारत देश महान या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. ह्या लेखामध्ये आम्ही माझा भारत देश महान विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला माझा भारत देश महान ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

           " भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत."

     आपण सगळ्यांनीच अशी प्रतिज्ञा शाळेमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी ऐकली असेलच. कधी विचार केला आहे का, की हा माझा देश असा वेगळा का आहे? इतर देशांपेक्षा त्याच्यामध्ये अशी विविधता का आहे? आणि कुणालाही भारतीय आहे म्हंटल्यावर इतका अभिमान का वाटतो? कारण माझ्या देशात इतकी विविधता आहे जी कुठल्याच देशात नाही !

     एका भारतात निसर्ग, प्राणी, मानव, त्यांच्या चालीरीती, दिसणे, भाषा ह्यामध्ये एवढी विविधता आहे की जर पूर्ण भारत फिरलो तर सगळे जग बघितल्यासारखे होईल. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण युरोप, चीन, अफगाणिस्तान आणि साउथ आफ्रिका सगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करतील अशी माणसे आहेत. अरब देशासारखे राजस्थानात वाळवंट आहे तर काझीरंगाला अफ्रिकन सफारी सारखा पार्क आहे. काय नाही आहे माझ्या देशात ?

     खरोखर अभिमान वाटण्यासारखी, खूप खूप काळापासून आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. जगातल्या सगळ्या जुन्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती आहे. किती समृद्ध संस्कृती आणि समृद्ध जीवन पद्धती आहे आपल्या भारतामध्ये! असे म्हणतात की, पूर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता. ह्यात अतिशयोक्ती जरी असली तरी, हे खरे आहे की पूर्वी खरोखर भारतामध्ये अतिशय श्रीमंती होती. इंग्लंड, फ्रांस, पोर्तुगाल, स्पेन अशा देशांतून लोक व्यापारासाठी येत होते आणि थैल्या भरून-भरून संपत्ती घेऊन जात होते.

     त्यांचीच वाईट नजर भारताच्या भरभराटीला लागली आणि सुवर्ण काळ ओसरायला लागला. एखाद्या फळांनी लगडलेल्या झाडाला वात्रट पोरांनी दगड मारून फळे तोडावीत तसेच खैबर खिंडीतून अफगाणी, हिमालयातून मंगोलियन, दक्षिणेकडून पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच ह्या लोकांनी हल्ले करून संपत्ति लुटून न्यायला सुरुवात केली. त्यांच्या यशाचे कारण त्यांचा पराक्रम नसून भारतातली दुही कारणीभूत झाली.

     काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात १८ पगड जाती जमातीचे, रंग रुपाचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. त्या वेळेला त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. राजे विलासी होते आणि आपापसातच लढत होते. ह्या दुहीचा नेमका फायदा ब्रिटीशांनी उचलला आणि आपल्या देशावर तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपली सगळी संपत्ती लुटून इंग्लंडला नेली. राज्ये खालसा केली. हेच काय तर आपला जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात विराजमान झाला. त्यांच्याच काळात देशाचे दोन तुकडे पाडून पाकिस्तान जन्माला आला.

            लेखक-अजय  चव्हाण
          ----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॅम्पस जुगाड.कॉम)
                      ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2021-सोमवार.